Bribe Trap
Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: सातबारावर वारसांची नावे लावण्यासाठी दीड हजाराची लाच; तलाठीसह कोतवाल ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

कजगाव (जळगाव) : सातबारा उताऱ्यावर वारसांचे नाव लावण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच (Bribe) घेणाऱ्या भोरटेक (ता. भडगाव) येथील तलाठीसह महिला कोतवालास लाचलुचपत विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

भोरटेक (ता. भडगाव) येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार शेतकऱ्यांकडे वडीलोपार्जीत जमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वारसांची नावे लावण्यासाठी संशयित आरोपी तलाठी सलीम अकबर तडवी (वय ४४) याने सुरूवातीला १ हजार रूपयांची लाच घेतली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांच्याकडे १ हजार ५०० रूपयांची मागणी महिला कोतवाल कविता नंदु सोनवणे (वय २७ रा. तांदलवाडी) यांनी केली.

याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाच्‍या पथकाने आज (१४ एप्रिल) दुपारी सापळा रचला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी असतानाही शासकीय कामे करण्यासाठी तलाठी आणि कोतवाल हे तलाठी कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT