Bori River Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: ‘बोरी’ने ऑगस्टमध्ये गाठली शंभरी; दोन दरवाजांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

‘बोरी’ने ऑगस्टमध्ये गाठली शंभरी; दोन दरवाजांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : तालुक्याला वरदान ठरलेले बोरी धरण यंदा मागीलवर्षाच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच शंभर टक्के भरल्याने नागरिकांसह शेतकरी (Farmer) सुखावले आहेत. धरणाच्या पाटलोट क्षेत्रात दोन- तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) धरणाच्या साठ्यात प्रचंड वाढ होऊन धरणाने शंभरी गाठली. त्यामुळे तालुक्याचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. एवढेच नव्हे तर बोरी धरणावर अवलंबून असलेल्या सात ‘केटीवेअर’ला देखील जीवदान मिळाले आहे. (Jalgaon News Bori Dam)

मागील वर्षापेक्षा यंदा समाधानकारक पाऊस (Rain) राहील, या आशेने शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर पेरणी केली. कालांतराने पावसाने चांगली साथ दिली. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (Jalgaon) पावसाने अचानक दडी मारली. ज्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

दोन दरवाजे उघडले

एकीकडे पिके उन्हाने मरत असताना दुसरीकडे तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, याची देखील चिंता सतावत होती. मात्र, शुक्रवारपासून दोन दिवस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले गेले. धरणाच्या साठ्यात वाढ झाल्याने आज दुपारी तीनला बोरी धरणाचे दोन दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आली. त्याद्वारे सद्यःस्थितीत धरणातून १ हजार ८०६ क्युसेस पाण्याच्या विसर्ग बोरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता, पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

सिंचनाचा प्रश्‍न सुटला

बोरी धरणातून नदीतून विसर्ग होणारे पाणी तामसवाडी, टोळी, तरडी, मोंढाळे पिंप्री, विचखेडा, पुनगाव, बहादरपूर, कोळपिंप्रीमार्गे अमळनेर येथून तापी नदीपात्रात जाते. पाण्याच्या या प्रवाह मार्गात तब्बल सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. सद्यःस्थितीत हे बंधारे भरू लागले आहेत. त्यामुळे सर्व के. टी. वेअरला जीवदान मिळाले आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा बहुसंख्य खेड्यांमधील शेतकऱ्यांना विशेषतः शेतीसाठा फायदा होतो. बंधारे देखील आता क्षमतेने भरू लागल्याने संपूर्ण नदीपात्रालगतच्या गावांमधील सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT