khadse mahajan
khadse mahajan 
महाराष्ट्र

खडसे– महाजन आले समोरासमोर; एकमेकांवर आरोपांच्‍या फैरींची जुगलबंदी

संजय महाजन

जळगाव : जिल्ह्यातील दोन प्रमुख नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय जुगलबंदी पहायला आणि ऐकायला मिळाली. अपेक्षेप्रमाणे प्रत्यारोपांच्या फैरीही आरोप झडल्या. निमित्त होते भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्यावतीने एकाचवेळी समोरासमोर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभांचे. (jalgaon-news-bodwad-nagar-panchayat-election-eknath-Khadse-girish-Mahajan-came-face-to-face)

जामनेर, बोदवड, धरणगाव (Dharagaon) आणि जामनेर ही चार शहरे भाषणाच्या केंद्रस्थानी होती. बोदवडमध्ये गांधी चौकात भाजपची तर समोर असलेल्या बाहेरपेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. एकमेकांच्या व्यासपीठापर्यंत आवाज जाईल; अशा पद्धतीने दोन्ही सभांचे स्पीकर ठेवण्यात आले होते. बोदवडला (Bodwad) खडसे- महाजन यांची जुगलबंदी एकाचवेळी समोरा- समोर आयोजित सभेत पाहण्यास मिळाली.

नेत्यांची जुगलबंदी

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बोदवडकरांना राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाषण सुरू होताच तिकडून गिरीश महाजन यांचे भाषण सुरु झाले. दोघेजण आरोप करू लागले की कोण काम केले. नेत्यांची ही जुगलबंदी ऐकण्यासाठी दोन्ही सभांमधील जागेत येऊन थांबत लोकांनी गर्दी केली होती. समोरासमोर झालेल्या या सभांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT