बावनकुळे बावनकुळे
महाराष्ट्र

आपले झाकण्यासाठी ईडीला दोष देणे चुकीचे; बावनकुळे यांचा राज्‍य सरकारवर निशाणा

आपले झाकण्यासाठी ईडी दोष देणे चुकीचे; बावनकुळे यांचा राज्‍य सरकारवर निशाणा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : केंद्र सरकार कुणावरही कारवाई करत नसून कुणाच्‍याविषयी तक्रार असल्‍याशिवाय कारवाई केली जात नाही. ईडीची चौकशी ही लागत असल्‍यास काही केलेले नसल्‍यास सामोरे जावे. उगाचच आपले झाकण्यासाठी ईडी, सीबीआयला दोष देणे चुकीचे आहे. काहीतरी काळे असेल म्हणूनच ईडी कारवाई करत असल्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दोन दिवस दौऱ्यानिमित्त जळगाव जिल्ह्यात भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आले आहेत. आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बावनकुळे म्‍हणाले, की राज्‍यात ईडी, सीबीआय कडून वेगवेगळ्या चौकशी सुरू आहेत. या चौकशी काहीतरी तक्रार आल्‍याशिवाय होत नाही. तक्रार आल्‍यानंतर त्‍याची चौकशी होते. यात काही तथ्‍य आढळले तरच पुढची कारवाई होत असते. मुळात ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्‍हणून चौकशी होवू द्यावी. देशात लोकशाही आहे. चुकीच्‍या मार्गाने कारवाई होणार नाही. परंतु, राज्‍यात वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. आपले झाकण्यासाठी ईडीला दोष देण्याचे काम केले जात असल्‍याचे म्‍हणत बावनकुळे यांनी राज्‍य सरकारवर निशाणा साधला.

तिकिट कापला म्‍हणून अन्‍याय नाही

विधानसभा निवडणूकीत तिकिट वाटताना भाजपने कोणावरही अन्‍याय केलेला नाही. पंकजा मुंडे यांना तिकिट दिले, इतके नाथाभाऊंच्‍या मुलीला तिकिट देण्यात आले होते. पक्षाने मला तिकिट दिले नाही पण माझ्यावर ३२ विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी सोपविली होती. तिकिट दिले नाही म्‍हणून पक्षाने अन्‍याय केला असे नाही. त्‍यातल्‍या त्‍यात भाजपने ओबीसींवर कधीच अन्‍याय केलेला नाही. उलट भाजपने जे नेते उभे केले आहेत ते ओबीसी आहेत. यामुळे अन्‍याय झाला असे म्‍हणने चुकीचे असल्‍याचे बावनकुळे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा १ कोटी रुपयांचा निधी

Wednesday Horoscope: देवीच्या कृपेने आर्थिक बाजू सुधारण्यासह जीवनातील अडचणी दूर होतील; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

Bhayandar Tourism : वीकेंडचा प्लान ठरला; भाईंदरमध्ये लपलाय सुंदर किनारा, पाहताच मनाला भुरळ पडेल

Kristina Coco: तर मी कबूल करते की मी वेश्या आहे...; व्हायरल झालेल्या रशियन मुलीला अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT