Accident 
महाराष्ट्र

भाच्‍याच्‍या भेटीला येत असताना काळ आला; अपघातात मुलगी जखमी

भाच्‍याच्‍या भेटीला येत असताना काळ आला; अपघातात मुलगी जखमी

Rajesh Sonwane

जळगाव : भुसावळहून जळगावकडे येत असलेल्या दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची कन्या जखमी झाली आहे. (jalgaon-news-bhusawal-jalgaon-highway-bike-sleep-accindent-one-death)

अपघातात मृत झालेले प्रकाश जोशी हे जळगावात एका सहकारी बँकेत कामाला होते. नोकरीला असल्‍याने त्‍यांचे भुसावळहून जळगावल रोजचे येणे होते. आज सुटी असल्‍याने भाच्‍याच्‍या भेटीला जायचे म्‍हणून संपुर्ण परिवार जळगावी येत होता. परंतु, प्रकाश जोशी यांच्‍यावर काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

पत्‍नी, मुलींना रेल्‍वेने बसविले अन्‌

भुसावळ येथील रहिवासी प्रकाश शाम जोशी (वय ४६) हे मुलगी आदिती (वय १८) हिच्यासोबत जळगाव येथे भाच्याकडे येत होते. त्यांची पत्नी आणि दोन मुली हे सकाळी रेल्वेने जळगावकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रकाश जोशी हे खेडीजवळ आले असतांना त्यांची गाडी अचानक स्लीप झाली. यामुळे ते मुलीसह महामार्गावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी आदिती ही जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT