Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: आई– वडीलांची भेटही राहिली; शिक्षणासाठी मामाकडे असलेल्‍या मुलाचा मृत्यू

आई– वडीलांची भेटही राहिली; शिक्षणासाठी मामाकडे असलेल्‍या मुलाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मामाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्‍या मुलाचा कालव्‍यात बुडून मृत्‍यू झाला. महिंदळे (ता. भडगाव) (Bhadgaon) येथील नामदेव नरसिंग पाटील यांच्या मुलीचा मुलगा मयूर नरेंद्रसिंग ठाकरे यांचा जामदा डाव्या कालव्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. (Tajya Batmya)

मामाकडे शिक्षणासाठी असलेला मयूर ठाकरे हा सुटीच्या दिवशी मामांना मदत म्हणून शेतात जायचा. तो शेतात गेला असता बैलांना पाणी पाजण्यासाठी कालव्यावर गेला. यावेळी त्याचा पाय घसरल्याने कालव्यात पडला. पोहता येत नसल्याने त्‍याचा पाण्यात बुडून त्‍याचा मृत्‍यू झाला. बैल घेऊन जाऊन बराच वेळ झाल्यामुळे शोधाशोध केल्यावर काही अंतरावर तो सापडला. त्याला गावकऱ्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास गिते व दत्ता मगर करत आहेत.

आई– वडीलांचा एकलुता मुलगा

गणेशपुरा (जि. धुळे) येथील नरेंद्रसिंग ठाकरे यांचा मुलगा मयूर याला शिक्षणासाठी आजी– बाबा व मामाकडे ठेवले होते. तो दहावीपासून येथे शिक्षण (Education) घेत होता. आई वडील पोटाची खडगी भरण्यासाठी आंबरनाथ मुंबई येथे वास्तव्यास होते. तो यावर्षी सु. गि. पाटील महाविद्यालयात बीएसस्‍सीच्या अंतिम वर्षाला होता. परीक्षा संपल्यावर दोन दिवसांनी तो आई वडिलांकडे जाणार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT