Muktai Palkhi
Muktai Palkhi Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari: पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान असलेली मुक्‍ताई पालखी मार्गस्‍थ; हरिनामाचा जयघोष

संजय महाजन

जळगाव : आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याने आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखी सोहळा कोथळी, मुक्ताईनगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने मार्गस्थ झाली. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी (Muktainagar) दुमदुमली होती. (jalgaon news Ashadhi Wari Muktatai Palkhi the first entrance to Pandharpur)

वारी दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Wari) विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो. त्या संत (Muktai Palkhi) मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्यावतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१३ वे वर्ष होते. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे.

पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, खासदार रक्षा खडसे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, रोहिणी खडसे आदींची उपस्थिती होती. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी पहाटे संत मुक्ताईंची महापूजा, काकडा आरती झाली. सकाळी किर्तनसेवा पार पडली. मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी

आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणाऱ्या यात्रेवेळी विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई निघतात; अशी वारकऱ्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. कोथळी गावात असलेल्या मुक्ताईच्या जुन्या मंदिरापासून दिंडीला सुरुवात होते. संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

Live Breaking News : १२ आणि १७ मे रोजी राज ठाकरे, नरेंद्र मोदी एकाच मंचावर, बाळा नांदगावकर यांची माहिती

LokSabha Election: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Kushal Badrike : “सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो...”; कुशल बद्रिके आयुष्याबद्दल खूप काही बोलून गेला, पोस्ट चर्चेत

Rohit Pawar Tweet | मतदानात भेसळ, मतदारांना पैसे वाटतानाचा Video रोहित पवारांकडून ट्वीट

SCROLL FOR NEXT