आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; वाऱ्यामुळे गळल्या कच्च्या कैऱ्या

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; वाऱ्यामुळे गळल्या कच्च्या कैऱ्या
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : यंदाच्‍या मोसमात आंब्‍याचे सिजन चांगले राहिले नाही. यात आता लागलेल्‍या कैऱ्यांचे देखील नुकसान मान्‍सून पूर्व येत असलेल्‍या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होत आहे. यामुळे आंबा उत्‍पादक शेतकरीचे (Farmer) देखील आर्थिक नुकसान होत आहे. (nandurbar news mango growers farmer loss mangoes dropped by the wind)

Nandurbar News
सात वर्षांपासून गावाला पाणी पुरवतोय शेतकरी; ३६० घरांना नळ कनेक्शन

यंदा सातपुड्यासह सपाटी भागातील नवापूर, नंदुरबार तालुक्यात देखील सुरुवातीपासूनच आंब्यांना चांगला बहर येऊन चांगली फळधारणा झाली होती. मात्र मान्सून पूर्व आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबे पिकण्याच्या आधीच झाडावरून गळून पडल्याने आंबा उत्पादकांना फटका बसला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मान्सून पूर्व आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

कच्‍च्‍या कैरीला दोन– तीन रूपये भाव

वाऱ्यामुळे गळून पडलेल्या कच्च्या आंबा ना आचारसाठी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दोन ते तीन रुपये किलो दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सातपुड्यातील धडगाव आणि अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यात कच्च्या आंब्यापासून आमसूल तयार करून विक्रीला चांगला दर मिळत असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com