Ashadhi Wari Railway Saam tv
महाराष्ट्र

भुसावळ– पंढरपूर स्‍पेशल रेल्‍वे; दोन दिवस गाड्या सुटणार

भुसावळ– पंढरपूर स्‍पेशल रेल्‍वे; दोन दिवस गाड्या सुटणार

संजय महाजन

जळगाव : आषाढी एकादशी काही दिवसांवर राहिली आहे. एकादशीनिमित्‍ताने पंढरपुरच्‍या विठ्ठल दर्शनाची भाविकांची ओढ वाढली आहे. अनेक भाविक गाडीने, बसने जात आहेत. परंतु, आषाढीच्‍या दोन दिवस भाविकांची सोय व्‍हावी; याकरीता (Bhusawal) भुसावळ ते पंढरपूर अशा स्‍पेशल (Railway) रेल्‍वे सुटणार आहे. (jalgaon news ashadhi wari Bhusawal Pandharpur Special Railway)

आषाढी वारी (Ashadhi Wari) करत अनेक भाविक यापुर्वी पंढरपुरकडे (Pandharpur) मार्गस्‍थ झाले आहेत. परंतु, आषाढीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अजूनही काही भाविक जात आहेत. शिवाय, काही भाविक ते आषाढीपुर्वी विठुरायाचे दर्शन घेवून परतीच्‍या मार्गावर असतात. अशा भाविकांसाठी रेल्‍वेची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे भाविक व वारकऱ्यांसाठी लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

दोन दिवस रेल्‍वे

पंढरपुरला जात असलेल्‍या भाविकांसाठी भुसावळ रेल्वे स्थानकहुन ९ आणि १० तारखेला विशेष भुसावळ ते पंढरपूर रेल्‍वे गाड्या सुटणार आहे. हीच रेल्‍वे पंढरपूरहून पुन्‍हा भुसावळसाठी मार्गस्‍थ होईल. आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ रेल्वे मंडळतर्फे नऊ आणि दहा या दोन दिवस विशेष गाड्या सोडण्यात येत असल्‍याने (Jalgaon) जळगाव, धुळे, नाशिक, बुलढाणा या जिल्ह्यातील भाविक व वारकऱ्यांनी लाभ घ्यावा; असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT