महाराष्ट्र

गावातून काढली जीवंत माणसाची प्रेतयात्रा; पावसासाठी वरूणराजाला साकडे

गावातून काढली जीवंत माणसाची प्रेतयात्रा; पावसासाठी वरूणराजाला साकळे

संजय महाजन

जळगाव : राज्‍यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवल आहे. मात्र काही भागात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असेच जळगाव जिल्‍ह्यातील अमळनेर तालुक्‍यात यंदा दुष्‍काळाची छाया आहे. यामुळे गांधली (ता.अमळनेर) गावात पाऊस नसल्‍याने गावातून जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढून वरूणराजाला साकळे घालण्यात आले.

जुलै उलटला असताना देखील अमळनेर तालुका परिसरात पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही भागात दुबार पेरणी होवून आता तिबार पेरणीचे संकट बळीराजासमोर उभे आहे. अशातच ग्रामीण भागात विविध अख्यायिका प्रचलित असतात. त्याचाच एक भाग म्हणून जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून प्रतिकात्मक अंत्‍ययात्रा काढण्यात आहे. हा प्रकार गांधली (ता. अमळनेर) गावात करण्यात आला.

गावातील तरूणांचा पुढाकार

जीवंत माणसाची प्रेतयात्रा काढण्यसाठी गावातील तरूणांचा पुढाकार होता. यात गावातील भिकन पाटील हा तरूण प्रतिकात्मक प्रेत म्हणून तिरडीवर झोपला. काही युवक खांदेकरी होवून गावातून प्रेतयात्रा काढली. या प्रेतयात्रेत आग्या म्‍हणून शशिकांत पाटील झाला होता. अंत्यात्रेत अनेक मुले रडत रडत भिकन मरी गया..असे म्‍हणत होते. या घटनेमुळे गावातील आबालवृद्धांची मात्र चांगलीच करमणूक झाली. आता फक्त वरुणराजाने कृपा व्‍हावी अशी अपेक्षा आहे.

दरवेळी भरतात महादेवाचे मंदीर

गावात पुरातन महादेवाचे मंदिर आहे. पाऊस लांबल्‍यास वरूणराजाला साकळे घालण्यासाठी पुरातन मंदिरातील महादेवाची पिंड पाण्याखाली घालत असतात. अर्थात मंदिराचा गाभारा पाण्याने भरत असतात. मात्र यंदा मंदिराचा जिर्णोद्धार झाल्‍याने यंदा मंदिरात पाणी न भरता जीवंत माणसाची प्रेतयात्रा काढण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

Maharashtra News Live Update: शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT