महाराष्ट्र

भावाविरूद्ध बहिणींची तक्रार; आईसाठी भांडताय त्‍या चौघी

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणने वृद्ध मातेला उदरनिर्वाहाकरिता ३ लाख रुपये व दरमहा खावटी देण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची अंमलबाजवणी मुलगा करीत नसल्याची तक्रार बहिणींनी तहसीलदाराकडे केली आहे. (jalgaon-news-amalner-tahshildar-Sisters-complaint-against-brother-fight-for-the-mother)

शहरातील बालाजीपुरा भागातील निर्मलाबाई गुलाब बडगुजर (वय ८०) यांनी त्यांचा मुलगा प्रकाश बडगुजर याने वडिलोपार्जित मालमत्ता टी.पी. नंबर १३४/२ व १०८/४ या स्वतःच्या नावाने बक्षीस पत्र करून दुसऱ्याला १८ लाखात विकून दिली आहे. तसेच वारसा हक्काचे घर देखील विक्री केले. मात्र त्याचा मोबदला न देता आईचा संभाळही करत नाही. त्यामुळे त्याच्याकडून मालमत्तेचा मोबदला आणि दरमहा अन्न, वस्त्र, औषधी आदी बाबींसाठी खावटी मिळण्याची मागणी जेष्ट नागरिक निर्वाह न्यायाधिकरणच्या अध्यक्ष सीमा अहिरे यांच्याकडे केला होता.

बहिणींचा चार वर्षापुर्वीच हक्‍कसोड

सदर मालमत्तेतून बहिणींनी २०१७ साली हक्कसोड केल्याने वडिलांच्या मालमत्तेचा प्रकाश याने एकट्याने लाभ घेतला. त्यावर अहिरे यांनी मुलगा प्रकाश व आशाबाई बडगुजर, कमलबाई बडगुजर, शोभाबाई बडगुजर, लता बडगुजर या चार मुलींना नोटिसा काढून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मुलाने आईला तीन लाख रुपये उदरनिर्वाहासाठी देण्यात यावेत तसेच दरमहा ४ हजार रुपये खावटी द्यावी. यासह मुलींनी प्रत्येकी ५०० रुपये द्यावेत असे आदेश केले आहेत. हा निर्णय ६० दिवसांच्या मुदतीत अपिलाधीन असेल असेही आदेशात म्हटले होते.

दोन महिने उलटूनही दिली नाही रक्‍कम

तहसीलदारांनी वृद्ध महिलेस मुलगा प्रकाश याच्याकडून तीन लाख रुपये मिळवून द्यावेत आणि खावटी देण्याबाबत कार्यवाही करून अहवाल पाठवण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. मात्र दोन महिने उलटूनही त्या मुलाने तीन लाख रुपये दिले नाहीत. म्हणून मुलींनी आज तहसीलदारांकडे आईला मदत मिळण्यासाठी भावाविरुद्ध तक्रार केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT