crime 
महाराष्ट्र

मुलगी दागिने अन्‌ रक्‍कम घेवून गायब; आईकडून मुलीसह पाच जणांविरूद्ध तक्रार

मुलगी दागिने अन्‌ रक्‍कम घेवून रफुचक्‍कर; आईने दाखल केला मुलीसह पाच जणांविरूद्ध गुन्‍हा

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : शहरातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे २० तोळे सोने व रोख रकमेसह दहा लाख ८० हजाराचा माल चोरून नेला. याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने दिल्यावरून शहरातील त्या आंतरधर्मीय प्रेमी युगुलासह पाच जणांवर अपहरणासह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील साई श्रद्धानगरमधील तरुणी २५ नोव्‍हेंबरला दुपारी साडे तीनच्या सुमारास घरातून निघून गेली. त्यावेळी त्यांच्या घराशेजारील छाया परदेशी या महिलेने सांगितले, की तुमची मुलगी घरातून निघून एका चारचाकीत निघून गेली. त्या गाडीत चार मुले बसली होती.

असा मुद्देमाल नेला

मुलीची आईने घरात तपासून पाहिले असता घरातील चार तोळ्यांच्या ३ लाख २० हजार रुपयांच्या दोन पोत, तसेच चार तोळ्यांच्या ३ लाख २० हजार रुपयांचे दोन हार, साडे तीन तोळ्यांच्या एक लाख ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या साखळ्या आणि तीन लाख रुपये रोख असा १० लाख ८० हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे लक्षात आले.

त्‍या मुलावरच शंका

१८ फेब्रुवारी २०२१ रोजी मोईन हा तरूणीच्या मागे मागे फिरून तिचे नाव घेत होता. त्यावेळी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता मोईनच्या आई वडिलांनी विनंतीवरून त्याने १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर पुन्हा नाव घेणार नाही व पाठलाग करणार नाही असे लिहून दिले होते. त्यामुळे मोईननेच मुलीचे अपहरण करून तिला सामील करून चोरी केल्याची खात्री झाल्याने सीमा सोनार यांनी फिर्याद दिल्यावरून मोईन शेख तसेच तरुणी यासह अन्य तीन अनोळखी तरुणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला कट करून अपहरण व चोरिचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रूघ्न पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT