जळगाव : आषाढी एकादशी निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगळग्रह मंदिर संस्थानच्यावतीने पर्यावरण जनजागृतीसाठी आज वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात अमळनेर (Amalner) तालुक्यातील पन्नास शाळांमधील पंधरा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. (jalgaon news Amalner Bhavnya Vriksha Dindi Fifteen thousand students participated)
जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे जिल्हाधकारी अभिजित राऊत यांनी मंगळग्रह मंदिर संस्थानचा भगवा झेंडा आणि दीप प्रज्वलन करून या दिंडीचा शुभारंभ केला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष दिगंबर महाले यांच्यासह तालुक्यातील सामाजिक आणि शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. काळाचा विचार करता मंगळग्रह संस्थांच्यावतीने पर्यावरण रक्षणासाठी घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असल्याचं आणि संपूर्ण जिल्हाभरात राबविला जायला हवा; असे मत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले.
पंधरा हजार विद्यार्थी सहभागी
दरवर्षी होत असलेली तापमानातील वाढ आणि घटत चालले पावसाचे प्रमाण पाहता वृक्ष संवर्धन होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर संस्थानच्यावतीने पर्यावरण रक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सर्व सामान्य जनतेत आणि शाळकरी विद्यार्थीमध्ये पर्यावरण रक्षणाची जनजागृती व्हावी; यासाठी संपूर्ण अमळनेर शहरात वृक्ष दिंडी काढण्यात आली. तालुक्यातील पन्नास शाळांमधील दहा हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.