Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन नववधू फरार; पोलिसांनी वधूसह चौघांना अटक

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : दलालांमार्फत लग्न लावून आणलेली नववधू लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातील रोकड व दागिन्यांसह चतुर्भुज झाल्यानंतर वर पक्षाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) तपास चक्रे फिरवून नववधूसह चौघांना ताब्यात घेतले आहे. (jalgaon news After wedding bride escapes with jewelry and cash police arrested four persons)

विवाह (Marriage) होत नसल्याने २७ वर्षीय युवकाने आपल्या परिचयातील पळसपुर (ता. शिरपूर) येथील व्यक्तीशी संपर्क करून लग्न जोडण्यासाठी सुरेश (रा. सेंधवा) यांच्याशी बोलणे केले. दलालांमार्फत मध्यस्थी झाल्यानंतर वधूस एक लाख 60 हजार रुपये, दागिने व साडी असा ऐवज देऊन तिचा चेतनसोबत विवाह (Jalgaon News) उरकण्यात आला. परंतु विवाह करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरातील कपाटातील २५ हजार रुपये रोख व दागिने घेऊन नववधू रात्रीच पसार झाली.

चारजण ताब्‍यात

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवून सुरेश आर्य (रा. सोनवळ सेंधवा), अनील धास्त (रा. मोहमांडळी- खरगोन), हाकसिंग पावरा (रा.हेद्रयापाडा- शिरपूर) व कलीता उर्फ लक्ष्मी किराडा (रा. मोहमांडळी -खरगोन) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्रसिंग पाटील, पंकज सोनवणे व महिला पोलीस योगिता चौधरी करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

SCROLL FOR NEXT