कांदा उत्‍पादन चांगले; बळीराजाला मिळेना दर

कांदा उत्‍पादन चांगले; बळीराजाला मिळेना दर
Onion
OnionSaam tv

जळगाव : कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. त्‍याच तुलनेत उत्‍पादन देखील आले आहे. विक्रमी आवक झाल्यामुळे बाजारातील कांद्याचे भाव गडगडले आहेत. सोबतच कांद्याला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. (jalgaon news Onion production is good Rate not received by farmer)

Onion
पेपरला जात असताना विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

भारतात जेवढा कांदा (Onion) पिकतो त्याच्या जवळपास ४० टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात होत असते. आधी २ हजार ते २५०० रुपये दर असलेला कांदा सध्या ४०० ते ८०० रुपये आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. ह्या वर्षी अनुकूल हवामान निर्माण झाल्यामुळे कांद्याचे विक्रमी उत्‍पादन राज्यात झाले आहे. विक्रमी (Jalgaon News) आवक झाल्यामुळे बाजारातील कांद्याचे भाव गडगडले आहेत. सोबतच कांद्याला हमीभाव मिळत नाही.

निर्यातीचे धोरण आखावे

जी खरेदी होते हि खाजगी व्यपाऱ्यांकडून होते. मुळात दुसऱ्या देशांमध्ये कांद्याची चांगली मागणी आहे. परंतु सरकारकडून यावर कुठलेही पाऊल उचलले जात नाही. यामुळे राज्‍य व केंद्र सरकारने आपसात ताडमेळ साधून निर्यात धोरण आखावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com