dried-fruits
dried-fruits 
महाराष्ट्र

सुकामेव्याच्या दरात वाढ..अफगणिस्तानातील स्थितीमुळे आयात बंद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अफगणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर तेथून निर्यात होणाऱ्या विविध वस्तूंवर निर्बंध लावले आहेत. याचा परिणाम भारत व अफगणिस्तानातील व्यापारावर झाला आहे. अफगणिस्तानातून भारतात येणारा सुकामेवा, मसाले पदार्थ्यांची आवक बंद झाली आहे. परिणामी, सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (jalgaon-news-afganisstan-taliban-conflict-impact-Increase-in-the-price-of-dried-fruits)

कोरोना काळात सुकामेव्याच्या किमतीत घसरण झाली होती. यामुळे अनेकांनी इम्युनिटी वाढविण्यासाठी सुकामेव्याच्या उपयोग केला. सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत किलोने बदाम, काजू उपलब्ध होते. मागील दिवाळीत अनेकांनी गिफ्ट बॉक्स म्हणून काजू, बदामाचा वापर केला. आता अफगणिस्तान तालिबानने हाती घेतल्यानंतर भारतात निर्यात होणारे सुकामेवा, मसाल्यांवर निर्बंध घातले आहेत. अफगणिस्तानातून नवी दिल्लीत सुकामेवा, मसाल्यांच्या हबमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते. तेथून भारतातील सर्व राज्यात सुकामेवा, मसाले रवाना होतात. आता नवी दिल्लीतच सुकामेवा, मसाले येत नसल्याचे चित्र आहे

ऑस्ट्रेलिया असू शकतो पर्याय

सुकामेवा ऑस्ट्रेलियावरूनही भारताला आयात करता येणार आहे. मात्र, अफगणिस्तानाने निर्बंध घातल्याने भारतात सुकामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया या परिस्थितीचा फायदा घेऊन सुकामेव्याच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातून आता लागलीच सुकामेवा आयात करता येणार नाही. मात्र, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तेथे सुकामेव्याची नवीन उत्पादने येतील. तेव्हा त्याची भारतात आयात करता येऊ शकते, अशी माहिती दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.

सुकामेव्याचे दर असे...

प्रकार-- पूर्वीचे दर--आताचे दर (प्रती किलो)

बदाम-- ७००-- ११००

काजू-- ६५०-- १००

खारीक-- १५०-- २००

पिस्ता-- ७००-- १२००

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT