corona vaccination
corona vaccination 
महाराष्ट्र

लस न घेतलेल्यांवर कारवाई; दंडाच्‍या कठोर अंमलबजावणीचे आदेश

Rajesh Sonwane

जळगाव : कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरियंटपासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने सर्वानाच लसीकरण गरजेचे आहे. यासाठी विविध ठिकाणी लसीकरणाची केंद्रे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. लसीकरण केले नसल्यास नागरिकांना दंड करण्याच्‍या सूचना सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दिल्या आहेत.

कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तोचे पालन न करणा-या व्यक्तीस पाचशे रूपयांचा दंड आकारण्यात यावा. ज्यांना आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविंड अनुरुप वर्तन लादणे अपेक्षित आहे. अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तृत (जागेत) जर एखाद्या व्यक्‍तीने कसून केल्याचे निदर्शनास आले, तर त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिकक्‍त अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा दहा हजारांचा दंड आकारता येईल.

तर आस्‍थापना बंद

जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण/सुनिश्‍चित करण्यात नियमितपणे कसूर करित असल्याचे दिसून आल्यास कोविडच्या अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशा संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्या संस्थेस/आस्थापनेस प्रत्येक प्रसंगी पन्नास हजारांचा दंडाची आकारणी करण्यास पात्र राहील. वारंवार कसूर केल्यास कोविड -१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशा संस्था किंवा आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

व्‍यक्‍तींना पाचशे रूपये दंड

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (चारचाकी वाहने, बस) यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना पाचशे दंड व सेवा पुरवठादार यांना तितकाचा दंड आकारण्यात येईल. टॅक्सी किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्तीस पाचशे रूपये दंड करण्यात येणार आहे. पेट्रोल पंप, बस, रेल्वे स्थानक, खासगी बसेस, दुकाने, आस्थापना यांच्यावर जावून कोविड नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाइचे आदेश तहसिलदार, आयुक्त, मुख्याधिकारी, पोलिस आंदींना देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

Gardening करण्याचे आरोगदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT