Accident saam tv
महाराष्ट्र

शस्‍त्रक्रीया झालेल्‍या आईची भेट घेवून परतणाऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू

शस्‍त्रक्रीया झालेल्‍या आईची भेट घेवून परतणाऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : मामाकडेच शस्त्रक्रिया झालेल्या आईला बघायला आलेल्या मुलाचा अवघ्या काही मिनिटांत अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १७) दुपारी कलागुरू मंगल कार्यालयासमोर हा अपघात झाला. मालेगाव (Malegaon) येथील दीपप्रभा महाजन यांचा कार्तिक नावाचा ‘दीप’ विझून तिच्या आयुष्यात मात्र काळोख पसरला. (jalgaon news Accidental death of a child returning from a visit to mother)

मालेगावच्या संगमेश्‍वर येथील माळीनगरमधील दीपप्रभा महाजन यांना गर्भपिशवीची समस्या असल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांनी अमळनेर (Amalner) येथे स्त्रीरोगतज्ज्ञ असलेला आपला सख्खा भाऊ डॉ. दिनेश महाजन यांच्याकडे शस्रक्रिया केली होती. शस्रक्रिया झाल्याने त्यांचा मुलगा कार्तिक (वय २१) हा गौरव वाघ (वय १८, रा. ज्योतीनगर) या मित्रासह दुचाकीवर (एमएच ४१, एपी ६४०१) आईला बघायला आला होता.

काही मिनिटातच मुलाच्‍या मृत्‍यूची बातमी

तब्येतीची चौकशी करून कार्तिक परत मालेगावला जाण्यासाठी निघाला असतानाच कलागुरू मंगल कार्यालयाजवळ ट्रॅक्टर वळण घेत असताना त्याचा गोंधळ उडाला आणि धक्का (Accident) लागून तो पडला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या पिक-अप व्हॅनखाली त्याचे डोके दाबले गेले. कार्तिकच्या मेंदूचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर अक्षरश: तुकडे (Accident Death) पसरले होते. त्याचा मित्र गौरवही जखमी झाला. घटनास्थळाहून मनोज बिऱ्हाडे व एका मित्राने जखमी गौरवला तातडीने दवाखान्यात नेले. तर राकेश परदेशी, सूरज परदेशी, भटू तोमर यांनी कार्तिकचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, मधुकर पाटील यांनी पंचनामा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT