Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भाऊबीजनिमित्‍ताने बहिणीला घेवून भाऊ दुचाकीने जात होता. घरी पोहचण्यापुर्वीच चोपडा (Chopda) तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ दुपारी दुचाकीला ट्रकने जोरदार (Accident) धडक दिली. यात मामा व भाचीचा जागीच मृत्‍यू (Death) झाला. अपघातातील मृतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. (Tajya Batmya)

चोपड्याकडून धरणगावकडे (Dharangaon) जात असताना रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर दुचाकीला समोरून येणारा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident News) एक सहा वर्षीय विधी कोळी या चिमुकलीचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) याचा देखील मृत्‍यू झाला. मयत हा बहिणीला घेऊन विरवाडे (ता. चोपडा) येथून घरी जात असताना सदर अपघात झाला.

महिला व दीड वर्षीय मुलगा जखमी

एक महिला गंभीर जखमी आहेत. तर दीड वर्षीय चिमुकला हा सुखरूप आहे. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूकीची कोंडी झाली होती. सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी कर्मचारी जात पुढील कार्यवाही सुरु केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT