Accident 
महाराष्ट्र

मजूरांची गाडी पलटली; तीन जण जागीच ठार

मजूरांची गाडी पलटली; तीन जण जागीच ठार

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : मजुरांना घेऊन येणारे भरधाव वाहन उलटल्याने तीन जण जागीच ठार झाले; तर सहा जण जखमी झाले. सदर अपघात नांदगाव रस्त्यावरील हिरापूर (ता. चाळीसगाव) गावाजवळ बुधवारी (ता.१) रात्री अकराच्या सुमारास घडला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे रवाना करण्यात आले.

डोंगरगाव (ता. पाचोरा) येथील काही मजूर कामानिमित्त मनमाड गेलेले होते. क्रूझर गाडीने (क्रं. एमएच १३ एसी ५६०४) घरी डोंगरगावला परत येत असताना रात्री चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ क्रूझर भरधाव वेगात असल्याने अचानक घसरली. गाडी वेगात असल्याने रस्त्यावर आदळून झालेल्या अपघातात गाडीतील ३ जण जागीच ठार झाले.

दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघात इतका भीषण होता, की गाडीतील सर्वच्या सर्व मजूर गंभीर जखमी झाले, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी व इतर प्रवासी वाहनात होते.

आमदारांचे धावले मदतीला

अपघाताची माहिती समजताच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी तातडीने दोन रुग्णवाहिका रवाना केल्या.स्वतः लगेचच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना योग्य त्या सूचना केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT