जळगाव : कोरोनाची तिसरी लाट आल्याने लागलीच शाळा बंदचा निर्णय झाला. परंतु, हा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत झालेल्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २ हजार ४८७ शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी माध्यमिक शाळातील २१ विद्यार्थी तर ७१ शिक्षकांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. (Jalgaon Corona News: 71 teachers 21 students corona affected in the district)
राज्यात कोरोनाचे रुग्ण डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शाळा बंद (School Close) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण, मृत्यूदर कमी असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. परंतु, स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार आजपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या.
दोन हजाराहून अधिक शाळा खुल्या
जिल्ह्यात (Jalgaon) ग्रामीण भागातील पहिली ते बारावीच्या २ हजार ४८७ शाळा सुरू झाल्या. यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३ लाख ७५ हजार ४६१ एवढी आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३३ हजार २३५ आहे. यापैकी एकूण १ लाख ८९ हजार ४७ विद्यार्थी सोमवारी शाळेत आले होते.
विद्यार्थी- शिक्षक कोरोनाबाधित
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संख्या वाढत आहे. यात विद्यार्थी व शिक्षकदेखील बाधित झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मिळून ७१ शिक्षक तर माध्यमिक शाळेतील २१ विद्यार्थी कोरोना बाधित झालेले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.