Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : जळगाव शहरात कारमध्ये पुन्हा सापडले ६३ लाखांची रोकड; पोलिसांकडून तपास सुरु

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अमळनेर तालुक्यात कोटीची रोकड सापडली होती. यानंतर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासणीत कारमध्ये ६३ लाखांची रोकड सापडून आली आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर (Police) पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याच नाकाबंदी दरम्यान जळगाव तालुक्यातील कासोदा येथे दीड कोटी रुपये तर अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथे १६ लाख ३८ हजार रुपये सापडून आले होते. यानंतर पुन्हा एकदा जळगाव शहरात ६३ लाखांची रोकड सापडून आल्याने (Jalgaon) जळगावात खळबळ उडाली आहे. 

रोकडबाबत चौकशी सुरु 
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान रोखण्यात आलेल्या एका कारमध्ये रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी हि रोकड जप्त करून मुद्देमाल जमा करण्यात आली आहे. दरम्यान नेमकी ही रोकड कुणाची यासंदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- पुढील २ दिवस रामकुंड परिसर बंद ठेवण्यात येणार

Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही! १० वर्षांची जेल आणि १ कोटींचा दंड; सरकार आणतंय कडक कायदा

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २०००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Acterss Death: ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वात हळहळ

साबुदाण्यात प्लास्टिक? खरेदी करताना 'ही' एक गोष्ट नक्की तपासा

SCROLL FOR NEXT