Bori River Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: बोरी धरणातून नदीत 451 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

बोरी धरणातून नदीत 451 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : दोन दिवसांपासून धरण परिसरातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे बोरी धरणाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पारोळा (Parola) तालुक्यासह धुळे (Dhule) जिल्ह्यातील गावे यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. धरणाची पाणी पातळी वाल्‍याने नदीत ४५१ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. (Jalgaon News Bori Dam)

बोरी धरणाने अर्धशतक पार करून आज ते 80 टक्क्यावर आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने (Rain) तालुक्यात दडी मारली होती. त्यामुळे पिके उन्हामुळे तर धरण पाण्यावाचून कासावीस झाले होते. वरूण राजाने कृपादृष्टी करावी. यासाठी तालुक्यासह धरण परिसरातील शेतकऱ्यांनी (farmer) परमेश्वराला साकडे घातले होते. किंबहुना धरण परिसरात मुसळधार पाऊस न झाल्यामुळे धरणाची पाणी पातळी खालवली जात होती.

पाणी पातळी वाढली

पाणलोट क्षेत्रात अनेक बंधारे बांधली गेल्याने त्यात जोपर्यंत पाणी साठा ओसांडला जात नाही. तोवर धरणाची पाणी पातळी वाढत नाही. मात्र 5 ऑगस्‍टच्या पाऊस तामसवाडी मंडळासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे तामसवाडीसह आजूबाजूचा परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

१ वक्रद्वार उघडले

दरम्‍यान आज (७ ऑगस्‍ट) सकाळी 11 वाजता बोरी धरणाचे 1 वक्रद्वार 0.15 मीटरने उघडण्यात आले आहे. त्याद्वारे नदीपात्रात एकूण 451 क्‍यूसेक पाण्याच्या विसर्ग बोरी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे; असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT