Railway Line Crossing Jalgaon News
Railway Line Crossing Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

रेल्वे रूळ ओलांडताना ३७० जणांचा मृत्‍यू; सहा महिन्‍यातील नोंद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अनेकजण जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असतात. अगदी अनावधानाने म्‍हणा की जाणून बुजून म्‍हणा रेल्‍वे रूळ ओलांडत असतात. या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यात मागील सहा महिन्यात (Bhusawal) भुसावळ रेल्वे विभागात ३७० जणांना जीव गमवावा लागला आहे. (jalgaon news 370 killed while crossing railway lines in last six month)

रेल्‍वे (Railway) प्रशासनातर्फे वारंवार सुचना दिल्‍या जातात. परंतु, नागरीक या सुचनांच पालन करताना दिसून येत नाही. यामुळे रेल्‍वे स्‍टेशनवर एका प्‍लॅट फॅार्मवरून अन्‍य प्‍लॅटफॅार्मवर जाण्यासाठी दादराचा वापर न करता रेल्‍वे रूळ ओलांडत असतात. यामुळेच भुसावळ विभागात दररोज कुठल्या ना कुठल्या स्टेशन परिसरात रूळ ओलांडताना (Accident) अपघाताची घटना घडत असतात. गेल्या वर्षी तब्बल ५०९ जणांना मृत्यू (Death) झाला असल्याचे भुसावळ रेल्वे सुरक्षा बलातर्फे सांगण्यात आले.

जळगाव रेल्‍वे स्‍थानक परिसरात वीस

जळगाव (Jalgaon) रेल्वे स्टेशन परिसरात २० जणांच्या अपघाताची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे आहे. मात्र, यातील काही आत्महत्या असून काही रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. घटना घडल्यावर संबंधित रेल्वे गाडीवरील लोको पायलट ज्या पद्धतीची फिर्याद देतो; त्यानुसार मृत्यूची नोंद होत असल्याचे सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha News : 1 मिनिट बाकी असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला! अनिल जाधवांच्या माघारीनं कुणाला दिलासा?

Honeymoon Dress Ideas: हनिमूनसाठी हटके ड्रेस आयडिया

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

Nashik Loksabha: फक्त १ मिनीट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार... बंडखोर अनिल जाधवांमुळे नेते कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT