Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: चोरीची अनोखी शक्‍कल; कारची हवा सोडली अन्‌ लांबविले तीन लाख

चोरीची अनोखी शक्‍कल; कारची हवा सोडली अन्‌ लांबविले तीन लाख

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रायपूर कुसुंबा येथील किराणा दुकानदार माल घेण्यासाठी दाणाबाजारत कार घेऊन आले होते. त्यांच्या (Jalgaon News) कारच्या मागील चाकाची हवा सोडून, तुमच्या कारची हवा निघतेय, असे म्हणत लक्ष विचलीत केले. यानंतर कारमधील तीन लाख पाच हजारांची रोकड (Crime) असलेली बॅग लंपास केली. (Live Marathi News)

रायपूर कुसुंबा (ता. जळगाव) येथील किरणामाल विक्रेते संदीप परदेशी (वय ३५) मंगळवारी (ता. २१) मारुती इको (एमएच १९ सी झेड ९२२१) व्हॅन घेऊन माल खरेदीसाठी दाणाबाजारात आले होते. खरेदीसाठी परदेशी यांनी घरून ४ लाख ५ हजार रुपये आणले होते. बाजारात पोचल्यावर त्यांनी अमित ट्रेडर्स या व्यापाऱ्याला १ लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांनी नारळाचे पोते आणून व्हॅनमध्ये ठेवले. कार वळविण्यासाठी ते स्टेअरिंगवर बसले.

खाली उतरले अन्‌

याच वेळी कारच्या मागे उभ्या भामट्याने त्यांना सांगितले, की तुमच्या कारच्या मागील चाकाची हवा कमी होत आहे. त्यामुळे परदेशी कारच्या खाली उरतले आणि चाक पाहण्‍यासाठी कारच्या मागे गेले. ही संधी साधून भामट्याने कारच्या सीटशेजारी ठेवलेली ३ लाख ५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक किसन नजन पाटील, विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी बाजारासह परिसरातून सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. याबाबत परदेशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रमेश शेंडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Leopard Attack: चिमुरड्यांनी बिबट्याला पळवलं, दप्तरानं वाचवला विद्यार्थ्याचा जीव

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

SCROLL FOR NEXT