Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar News: भाजीपाल्याचे उत्पादन घटण्याची शक्यता; अवकाळी पावसामुळे नुकसान

Farmers News: भाजीपाल्याचे उत्पादन घटण्याची शक्यता; अवकाळी पावसामुळे नुकसान
Published on

सागर निकवाडे

नंदूरबार : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा परिणाम भाजीपाला पिकांच्या (Nandurbar News) उत्पादनावर होणार आहे. येणाऱ्या काळात भाजीपालाचे उत्पादन कमी होऊन भाजीपाल्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News
Satara Police : तुझ्या बापाचा नाेकर आहे का ! पाेलिसाने त्याला मारली कानाखाली; Video Viral झाला ना भाऊ

नंदुरबार जिल्हा गुजरातचा सीमा वरती भागात आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला गुजरात राज्यातील मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील ही मोठ्या बाजारपेठांमध्ये जात असतो. मात्र गेला आठवडाभर नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांना बसला आहे. यात बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा (Farmer) संकटात सापडला आहे.

Nandurbar News
Raj Thackeray Speech: 'धन्य त्यांची हास्यजत्रा...' राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीची खोचक टीका

उत्‍पादन घटल्याचा अंदाज

भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. टमाटे, कोबी आणि मिरची, वांगे यासोबत इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादन घटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नैसर्गिक संकटाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. येणाऱ्या काळात बाजारपेठ मधील भाजीपाल्याचे आवक घटून भाव वाढीची शक्यता देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com