गूळ धरण 
महाराष्ट्र

गूळ धरणात २८.३६ टक्के पाणी; चोपडा शहरास दीड वर्षे पुरेल इतका आरक्षित साठा

गूळ धरणात २८.३६ टक्के पाणी; चोपडा शहरास दीड वर्षे पुरेल इतका आरक्षित साठा

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गूळ मध्यम प्रकल्पात २८. ३६ टक्के साठा शिल्लक असून यातून आरक्षित साठ्यानुसार शहराला दीड वर्षे पुरेल इतका आरक्षित पाणीसाठा असून पाणीटंचाई भासणार नाही, मात्र पाण्याची बचत प्रत्येक नागरिकाने करावी असे आवाहन चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जिवन चौधरी यांनी शहरातील नागरिकांना केले आहे. (jalgaon-news-28.36-percent-water-in-gud-Dam-chopda-city-water-issue)

सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या व चोपडा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गूळ धरणात २८.३६ टक्के साठा असल्याची माहिती गूळ प्रकल्प अभियंता राहुल भालकर यांनी दिली आहे. यातून चोपडा नगरपालिकेसाठी ३.३० दलघमी इतके पाणी आरक्षित आहे. योग्य नियोजन केल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही. गूळ धरणाची क्षमता २२.७६ दलघमी इतकी असून आज जिवंत पाणीसाठा म्हणून ६.४५७ दलघमी इतके पाणी सद्यस्थितीत धरणात उपलब्ध आहे. रविवारी (ता. ८) पाण्याची पातळी २६०.७७० मीटर इतकी होती. गूळ धरणातून चोपडा तसेच धरणगाव शहरास पिण्याचे पाणी आवर्तनद्वारे सोडण्यात येते. दोन्ही शहराच्या नगरपालिकेने योग्य नियोजन केल्यास शहरांना पाणीटंचाईची अडचण होणार नाही. तसेच तालुक्यातील प्रकल्पाशेजारी असलेल्या आडगाव या गावासही पिण्याचे पाणी धरणातून दिले जाते.

पाणीटंचाई भासू देणार नाही : नगराध्यक्षा मनीषा चौधरी

आरक्षित पाणी साठ्यानुसार शहराला दीड वर्षे पुरेल इतका आरक्षित पाणीसाठा गूळ प्रकल्पात आहे. प्रत्यक्ष धरणातून पाण्याची उचल होत नसल्याने कुठेच पाणी वाया जात नाही व थेट निसर्गाचे पाणी शहरवासियांना पिण्यास मिळते. अजून दोन महिने पावसाळ्याचे बाकी आहेत. भविष्यात निसर्गाने साथ दिल्यास भरपूर साठा होऊ शकतो. परंतु तरीही प्रकल्पातील सद्य स्थितीत असलेल्या २८.३६ टक्के इतका पाणीसाठ्या पैकी आरक्षित पाणीसाठा वापरल्यास दीड वर्ष पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. शहरास कोणत्याही प्रकारे पाणीटंचाई भासू देणार नाही पण तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी केले आहे. तालुक्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्याने पिकांना अडचणी येत आहेत. तालुक्यात ५ ऑगस्टपर्यंत १८२.९१ मि.मी पर्जन्यमान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT