वीजचोरी saam tv
महाराष्ट्र

प्रामाणिक ग्राहकांवर भार; २४ टक्‍के गळती, तब्‍बल साडेनऊ कोटींची वीजचोरी

प्रामाणिक ग्राहकांवर भार; २४ टक्‍के गळती, तब्‍बल साडेनऊ कोटींची वीजचोरी

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्ह्यात वीजबिल भरण्याचे ग्राहकांचे प्रमाण चांगले आहे. बिल प्रामाणिकपणे भरले जात असले तरी जिल्ह्यात विजेचा अनधिकृत वापर, विजेची चोरी, शॉर्टसर्किट यामुळे होणारे गळतीचे प्रमाण २४.२३ टक्के आहे. या गळतीचा महावितरणला (MSEDCL) मोठा फटका बसत असून, त्यामुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही मूळ बिलापेक्षा २४ टक्के अतिरिक्त बिल भरावे लागते असेच म्‍हणावे लागेल. (jalgaon news 24 percentage leakage and power theft of 9.5 carror in khandesh)

वीज कंपनीचा जो ग्राहक प्रामाणिक वीजबिल भरेल, त्याला महावितरणकडून २४ तास वीज दिली जाते. त्यासाठी ए., बी., सी., डी., ई आणि एफ असे फीडरचे भाग करण्यात आले आहेत. यात डी. ई व एफ या फीडरवर अधिक भारनियमन (Load Shedding) केले जाते. मात्र सध्‍या राज्‍यात कोठेही भारनियमन होत नाही. असे असले तरी गळतीचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्‍या गळतीचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडत आहे. यामध्‍ये जळगाव (Jalgaon) परिमंडलाची वितरण हानी २४.२३ टक्के आहे.

साडेनऊ कोटींची वीजचोरी

आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांस मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यात जळगाव (Jalgaon News) परिमंडळात एप्रिल-२०२१ ते डिसेंबर-२०२१ या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. नऊ महिन्यांत सहा हजार १३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्‍याकडून साधारण ६७ लाख ९९ हजार ७८१ युनिटद्वारे नऊ कोटी ४० लाखांची वीजचोरी केली आहे.

५५ वीजचोरांवर गुन्‍हे

खानदेशात एकूण सहा हजार १३ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची २५५ प्रकरणे उघडकीस आली. आकडा टाकून थेट वीज चोरल्याची दोन हजार ६०४ प्रकरणे, तर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याची तीन हजार १५४ प्रकरणे आहेत. या प्रकरणांपैकी केवळ एक हजार ७६२ प्रकरणांमध्ये ग्राहकांनी वीजचोरीची बिले व तडजोड शुल्क भरले आहे. मात्र बिल न भरणाऱ्या ५५ प्रकरणांमध्ये महावितरणने गुन्हे नोंदवले आहेत.

खानदेशातील वीजचोरी

जिल्‍हा........प्रकरण............युनिट.....................वीजचोरीची रक्‍कम

जळगाव......४३६३.......५२ लाख ६२ हजार ५७५...सहा कोटी ९८ लाख

धुळे..........९१५..........७ लाख ५६ हजार २३६....एक कोटी पाच लाख

नंदुरबार......७३५..........७ लाख ८० हजार ९७०.....एक कोटी ३६ लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT