Railway News Saam tv
महाराष्ट्र

Railway: भुसावळ विभागातील १८ रेल्वे गाड्या रद्द; चौथ्या रेल्वे लाईनचे काम

भुसावळ विभागातील १८ रेल्वे गाड्या रद्द; चौथ्या रेल्वे लाईनचे काम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रेल्‍वे प्रशासनाकडून चौथ्‍या रेल्‍वे लाईनचे काम सुरू आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्‍या लाईनच्‍या कामामुळे भुसावळ (Bhusawal) विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Jalgaon News Railway Cancel)

रेल्‍वे (Railway) प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा रेल्वे मार्गाच्या (Jalgaon) कामासाठी रेल्वे प्रशासनाने २१ ते 28 सप्टेंबर या दरम्‍यान भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. श्रावण महिन्यातही ऐन सणोत्सवाच्या काळात आठ दिवस गाड्या रद्द होत्या. आता पुन्हा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गाड्या झाल्या रद्द

भुसावळ विभागातील शालिमार एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, पुरी– मुंबई एक्सप्रेस, हावडा- मुंबई, दुरंतो एक्सप्रेस, पुणे- हावडा दुरंतो एक्सप्रेस, हावडा- पुणे एक्सप्रेस, हटिया- पुणे एक्सप्रेस, समरसता सुपरफास्ट एक्सप्रेस, भुवनेश्वर एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, शालिमार- भुज एक्सप्रेस, पोरबंदर- शालिमार एक्सप्रेस, ओखा- शालिमार एक्सप्रेस, मालदा- सुरत एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT