Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : दिवाळीच्याच दिवशी मुलाने घेतला गळफास; उपचारादरम्यान मृत्यू

Jalgaon News : दिवाळीच्या दुसऱ्याची दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी (२ नोव्हेंबर) वेदांत याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरामध्ये स्कार्पने गळफास

Rajesh Sonwane

जळगाव : शहरातील निवृत्ती नगर येथील १४ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ४ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील निवृत्तीनगरतील रहिवासी वेदांत पंकज नाले (वय १४) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. वेदांत हा आठवीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान दिवाळीच्या दुसऱ्याची दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी (२ नोव्हेंबर) वेदांत याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरामध्ये स्कार्पने गळफास घेतला. त्याच्या आईला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर त्याला तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी वेदांतची प्राणज्योत मालवली. वेदांतने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वेदांतचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

SCROLL FOR NEXT