Shinde Sena leaders celebrating after registering an unopposed victory in Jalgaon Municipal Corporation elections. saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Municipal Corporation: शिंदे गटानं जळगाव महापालिकेत उघडलं खातं; ठाकरेंच्या उमेदवाराची माघार; आणखी ४ बिनविरोध होणार, शिवसेना नेत्याचा दावा

Jalgaon Municipal Corporation: ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर जळगाव महानगरपालिकेत शिंदे सेनेचा विजय झालाय. शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध विजयी झालाय. पुढे अशाच आणखी ४ जणांची बिनविरोध विजय होणार असल्याचा दावा, मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Bharat Jadhav

  • जळगाव महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची दमदार सुरुवात

  • गौरव सोनवणे बिनविरोध विजयी, शिंदेसेनेचे खाते उघडले

  • भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची आधीच बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया सुरू झालीय. अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध विजयी झाल्या. भाजपनंतर आता शिवसेनेनेही खातं उघडलंय. शिंदेसेनेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र गौरव सोनवणे हे बिनविरोध विजयी झालेत.

दरम्यान त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपल्यानंतर होणार आहे. भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे भाजपने महापालिकेत खाते उघडले होते. आता प्रभाग १८ अ मधून शिंदेसेनेनेही महापालिकेत धमाकेदार एंट्री केलीय.

प्रभाग क्रमांक १८-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिंदेसेनेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी माघार घेतलं. शिवसेनेच्या विजयानंतर शिंदे सेनेचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव सोनवणे यांचं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला टोमणा मारला.

शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे तर काल भाजपचा एक उमेदवार बिनविरोध झाला होता. ठाकरे गटाच्या उमेदवाराने का माघार घेतली माहित नाही, पण कदाचित विकासाला पाहून त्यांनी माघार घेतली असावी. सध्या जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध करण्याचे मिशन असून संध्याकाळपर्यंत आणखी चार उमेदवार बिनविरोध होतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय. जळगाव महापालिकेत महायुती बहुमताचा आकडा पार करेल, असा विश्वास देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

SCROLL FOR NEXT