Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वाढदिवसीच मुलीचा दुर्देवी मृत्‍यू; घरात तयारी सुरू असताना झाला घात

वाढदिवसीच मुलीचा दुर्देवी मृत्‍यू; घरात तयारी सुरू असताना झाला घात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : वाढदिवस असल्‍याने घरात तयारी सुरू होती. मुलगीही बाहेरून आली. परंतु, घरात प्रवेश करतानाच तिच्‍यावर काळाने घाला घातला. घरात सुरु असलेल्या कूलरचा शॉक (Electric Shock) लागून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Jalgaon News) झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत चिमुकलीचे नाव आहे. (Latest Marathi News)

मुक्ताईनगर शहरातील जिजाऊनगरात चेतन सनान्से हे परिवारासह वास्तव्यास आहेत. चेतन सनान्से यांचा सलून व्‍यवसाय आहे. चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवी हिचा शुक्रवारी (१९ मे) वाढदिवस होता. सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती. वाढदिवस असल्याने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर (Muktainagar) येथे तिच्या घरी आणण्यात आले होते.

नवीन कपडे आणले पण..

वैष्णवीच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती. तर आई– वडील तिच्यासाठी केक, नवीन कपडे आणण्यात गेले होते. तर वैष्णवी ही काका लखन सनान्से यांच्या घरी गेली होती. तिथून ती तिच्या घरी आली. घराबाहेर चप्पल काढताना तिला कूलरचा शॉक लागला. विजेचा जोरदार धक्का बसल्‍याने वैष्णवी फेकली गेली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित करुन वैष्णवीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैष्णवीची प्राणज्योत मालवली होती. आठ वाजता केक कापून वैष्णवीचा वाढदिवस साजरा केला जाणार होता. तिला नवीन कपडेसुद्धा आणले होते. मात्र वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडिलांसह इतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये दिसतात 'हे' मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश

Maharashtra Politics: दिवाळीत भाजपने बॉम्ब फोडला, शिवसेनेला खिंडार; आजी-माजी सरपंचांसह पदाधिकाऱ्यांनी कमळ घेतलं हाती

Maharashtra Politics : सत्ताधारी आमदारांना विकासनिधी की खैरात; निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी, वाचा स्पेशल रिपोर्ट

Chandra Gochar 2025: भाऊबिजेच्या दिवशी चंद्राचं होणार गोचर; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT