Chandrakant Patil Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Patil : विरोधकांना अजून एबी फॉर्मची प्रतीक्षा; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांचा रोहिणी खडसेंना टोला

Jalgaon News : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज गुरुपुष्य योग मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संजय महाजन

मुक्ताईनगर (जळगाव) : महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या मताधिक्याने विजयी होणार; असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच एबी फॉर्म अद्याप न मिळाल्यावरून रोहिणी खडसे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.   

मुक्ताईनगर (Muktainagar) विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज गुरुपुष्य योग मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोजक्या कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर तहसील कार्यालयात जाऊन आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी कुलदेवतेचा आशीर्वाद घेवून परिवाराने औक्षण करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. 

मोठ्या मताधिक्याने निवडून येईल

महायुतीचा उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो नक्कीच सार्थ ठरवून मोठ्या मताधिक्याने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून येईल. गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल; असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच माझ्या विरोधकांना अजूनपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही, असा टोला देखील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना यावेळी बोलताना लावला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

SCROLL FOR NEXT