Muktainagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar Accident : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा जागीच मृत्यू

Jalgaon News : पती-पत्नी हे मध्य प्रदेशातील फोपनार येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी दुचाकीने गेले होते. २३ एप्रिलला दोघेजण दुपारी निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकीने निघाले

साम टिव्ही ब्युरो

मुक्ताईनगर (जळगाव) : नातेवाईकांना भेटून घरी येत असताना दुचाकीला वाहणारे जिरदार धडक (Jalgaon) दिली. या घटनेत दुचाकीवरील पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात (Accident) मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ घडला. (Maharashtra News)

मुक्ताईनगर (Muktainage) तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील सुभाष रामराव घोडकी (वय ४०) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (वय ३४) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. पती-पत्नी हे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) फोपनार येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी दुचाकीने गेले होते. २३ एप्रिलला दोघेजण दुपारी निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष घोडकी आणि सोनूबाई घोडकी हे दांपत्य ठार झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहन चालक झाला फरार 

अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी मृताचा पुतण्या प्रवीण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्ती केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT