oxygen project 
महाराष्ट्र

हवेतून ऑक्सिजन निर्मिती आठवडाभरात; जळगावात साकारला जातोय प्रकल्‍प

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा ‘पीएसए’ जनरेशन प्रकल्प पुढिल आठवड्यात कार्यान्वित होत असून त्याबाबत प्रकल्प प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याची अडचण सुटण्यासाठी आणखी मदत होणार आहे. यापूर्वी २० किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक रुग्णालयात कार्यान्वित आहे. (jalgaon-medical-collage-Oxygen-production-from-the-air-during-the-week)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक हजार लिटर पर मिनिट क्षमता असलेला पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्दारा मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. केंद्र शासनाच्या पीएम केअर्स निधीतून या प्रकल्पासाठी मिळालेल्या ३३ लाख २३ हजार ३७० रुपये इतक्या निधीला जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मशिनरी दाखल

प्रकल्पासाठी लागणारी केबल लाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यासोबत एक २५० केव्हीचे जनरेटर मंजूर झाले असून त्याची उपलब्धता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी रुग्णालयात दाखल झाली असून तिला जोडणीचे काम सुरु आहे. तसेच प्रकल्प प्रस्थापित केला जावून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. यानंतर पुढील आठवड्यात तो कार्यान्वित होईल.

असा आहे प्रकल्प..

हा प्रकल्प निसर्गातील हवा ओढून त्यातून कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन वेगळा करुन शुध्द ऑक्सिजन साठवून ठेवील. हा ऑक्सिजन रुग्णांना देण्यासाठी उपयोगात येणार आहे. या प्रकल्पासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सदस्य सचिव म्हणून डॉ. प्रशांत देवरे तर सदस्य म्हणून डॉ. संदिप पटेल, डॉ. भाउराव नाखले, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे काम पाहत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

SCROLL FOR NEXT