Nimbalkar raje fort 
महाराष्ट्र

यावलचा इतिहासकालिन निंबाळकर राजे किल्‍ला होतोय उध्‍वस्‍त

यावलचा इतिहासकालिन निंबाळकर राजे किल्‍ला होतोय उध्‍वस्‍त

संजय महाजन

जळगाव : शिरपुर- चोपडा- यावल– बऱ्हाणपूर या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर असलेले यावल शहर इतिहासात एक महत्वाचे ठिकाण होते. यावल या तालुक्याच्या शहरात सुर नदीच्या काठावर सरदार निंबाळकर राजे यांचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा भुईकोट किल्ला आहे. मध्ययुगीन काळातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा सुंदर किल्ला आज केवळ पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे उध्वस्त होत आहे. वेळीच या किल्ल्याची डागडुजी न केल्यास हा किल्ला केवळ ढिगाऱ्याच्या रुपात शिल्लक उरेल. (jalgaon-marathi-news-historical-Nimbalkar-Raje-fort-of-Yaval-is-being-demolished)

मराठा काळात शिंदे यांच्या ताब्यात असलेले यावल त्यांनी १७८८ साली धार येथील पवार म्हणजेच निंबाळकराना जहागीर म्हणुन दिले. त्यानंतर त्यांनी यावल येथे किल्ल्याची उभारणी केली. या नंतरच्या काळात यावल येथील सूर्याजीराव निंबाळकर यांनी काही काळापुरता लासुर किल्ल्याचा ताबा घेतल्याच्या नोंदी आढळतात. नंतरच्या काळात १८३७ साली यावल पुन्हा शिंद्याकडे गेले. ते १८४३ पर्यंत त्यांच्याकडे होते. १८४४ ला यावल शहर व यावल किल्ला या दोन्ही गोष्टींचा ताबा इंग्रजांनी घेतला. १९८८ मध्ये झालेल्या यावल शहर विकास योजना आराखड्यात याच्या नोंदी आढळतात. तसेच झांबरे देशमुख यांना काही काळाकरिता यावल परगणा जहागीर म्हणुन मिळाल्याच्या नोंदी आढळतात. पण हा काळ नेमका कोणता याची निश्चिती करता येत नाही. राजे सरदार निंबाळकरांचा किल्ला इतिहासाची साक्ष देत जीर्णवस्थेत तग धरून उभा आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे लक्ष देऊन त्याची होणारी पडझड थांबविणे गरजेचे आहे. तरच आगामी काळातील नविन पिढीस निंबाळकरांच्या किल्ल्याची महती कळणार आहे.

दरवाजेही अवशेष रूपाने शिल्‍लक

यावल हे तालुक्याचे शहर भुसावळपासुन २० किमी तर जळगाव पासुन ४० किमी अंतरावर आहे. यावल शहराच्या पश्चिमेस सुर नदीच्या काठावरील टेकाडावर वसलेला हा चौकोनी आकाराचा किल्ला साधारण दिड एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत लहानमोठे असे ९ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असलेला पहिला पुर्वाभिमुख दरवाजा व दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आज केवळ अवशेष रूपाने शिल्लक आहे.

संपुर्ण यावल शहर पडते नजरेस

किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. किल्ल्याची नदीच्या दिशेने असलेली तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली असुन बुरुजांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. तटाची उंची जमिनीपासून ४० ते ५० फुट असुन तटबंदी बुरुजावर बंदुक तोफांच्या मारगीरीसाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी एका वाड्याचा चौथरा असुन या वाड्याच्या आवारात एक खोल विहीर आहे. किल्ल्यावर फेरी मारताना वाटेत चुन्यात बांधलेले दोन लहान व एक मोठा हौद पहायला मिळतो. किल्ला उंचवट्यावर असल्याने किल्ल्यावरून संपुर्ण यावल शहर नजरेस पडते. किल्ला पहायला अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन नदीच्या बाजुने बाहेर पडताना किल्ल्यापासुन अलिप्त असलेला एक बुरुज पहायला मिळतो. याशिवाय नदीच्या दुसऱ्या बाजुला किल्ल्यासमोरील लहान टेकडावर असलेले महर्षी व्यास मंदिर प्रेक्षणीय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT