buldhana, buldhana rain update,  saam tv
महाराष्ट्र

Rain : जळगाव जामोद - नांदुरा महामार्ग बंद; 55 गावांचा रस्ता संपर्क तुटला

अकोला व अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदी पातळीत अजूनही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

संजय जाधव

बुलढाणा : जळगाव जामोद - नांदुरा मार्गावरील येरळी नजीकच्या पुलावरून चार फूट पाणी आल्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद पडला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील 55 गावांचा रस्ता संपर्क तुटला आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. (buldhana latest marathi news)

बुलडाणा (buldhana) जिल्ह्यात दोन दिवसापासून काही भागात सततधार पाऊस (rain) सुरु आहे. संग्रामपूर , खामगाव, अकोला व जळगावजामोद या तालुक्यात दमदार कोसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील असंख्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यात वान नदीला पूर आल्याने वानखेड नजिकच्या पुलावरून दोन फुट पाणी वाहत असल्याने वानखेड गावासह इतर दोन गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे घरांची सुद्धा पडझड झाली असून दोन भावांच्या घरांच्या भिंती कोसळल्या असल्याने मोठे नुकसान झाले आहे. (buldhana rain update)

अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पाचे सहा वक्र दरवाजे उघडून वान नदीत 128 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्णा नदीच्या जळगाव जामोद - नांदुरा मार्गावरील येरळी नजीकच्या पुलावरून चार फूट पाणी आल्यामुळे हा महामार्ग (highway) बंद पडला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील 55 गावांचा रस्ता संपर्क तुटला आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदी पातळीत अजूनही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्णा नदी पात्रातून पुराचं पाणी पात्राबाहेर गेल असून नजीकच्या शेतीच मोठं नुकसान झालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT