Jamner News Saam tv
महाराष्ट्र

Farmer : पत्नी विठ्ठल दर्शनाला पंढरपुरात; शेतात जात पतीने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : पत्नी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तर घरी मुलगी व मुलगा होते. शेतात गेल्यावर त्यांनी दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी न जाताच शेतात फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : पत्नी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली होती. तर मुले घरीच होती. यातच शेतात गेलेल्या शेतकरी पतीने विषारी द्रव्य प्राशन करत जीवनयात्रा संपविल्याची घटना जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे समोर आली आहे. डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधील तोंडापूर येथील शेतकरी संजय रघुनाथ पाटील असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तोंडापूर ते फर्दापुर रस्त्यावर असलेल्या भारुडखेडा शिवारात संजय पाटील याचे शेत आहे. या शेतात गेल्यावर त्यांनी दिवसभर शेतात काम केले. दरम्यान पत्नी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तर घरी मुलगी व मुलगा होते. मात्र संजय पाटील घरी न जाताच शेतात फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन केले. 

पत्नी व मुलाला फोन करून दिली माहिती 

सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान शेतात फवारणीसाठी ठेवलेले विषारी औषधी पिऊन घेतले. काही वेळाने त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर झालेली चुक लक्षात येताच; त्यांनी मुलगा व पत्नीला फोन करून विष पिल्याची माहिती दिली. यानंतर मुलाने तात्काळ शेताकडे धाव घेत वडिलांना दवाखान्यात उपचारासाठी जामनेर येथे आणले. तर जळगाव येथे त्यांना आंत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.   

कर्जफेडीची विवंचना 

संजय पाटील यांच्यावर आयसिआयसिआय बँक शाखा जामनेर यांचे ३ लाख २८ हजार ७०० रुपयाचा बोजा आहे. नियमित कर्जाच्या विवंचनानेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवासात २५ मिनिटे वाचणार, मिसिंग लिंकचं काम पूर्ण, या दिवशी होणार सुरू

कामाची बातमी! मुंबईहून पुणे अन् कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे, वाचा वेळापत्रक अन् थांबे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT