JALGAON ACCIDENT saam tv
महाराष्ट्र

जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रक-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अख्ख कुटुंब संपलं

Six Family Members Reportedly Killed in Truck-Bike Crash: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. मिळालेल्या महितीनुसार, आज दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मालदाभाडी परिसरात ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातातील मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, अपघात नेमका कसा घडला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; ठाकरे गटाच्या शाखेला शिवसैनिकांनी ठोकले टाळे?

दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा? RBIने लहान नोटांची छपाई कमी केली?

Jaggery Vs Sugaar For Ladoo: लाडू बनवताना गूळ की साखर काय वापरावे? आरोग्यासाठी काय बेस्ट?

भाजप-शिवसेना आमनेसामने; शिंदेसेनेच्या 4 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, राजकीय वर्तुळात खळबळ

'गोकुळ'मध्ये महायुतीचं सरकारी बहुमत; शासनाचे 4 सदस्य नेमण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT