Jamner Crime Saam tv
महाराष्ट्र

Jamner Crime : संशयातून प्रियकराने डोक्यात दगड टाकत केली महिलेची हत्या; शहापूर येथील धक्कादायक घटना

Jalgaon News : किरण हा महिलेच्या घरी आला. तिथे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या किरण कोळी याने महिलेच्या डोक्यात दगड टाकला

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : विधवा असलेल्या महिलेसोबत संबंध असताना डोक्यात संशयाने घर केले. यातून दोघांमध्ये वाद होऊन प्रियकराने महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शहापूर येथे घडली. या घटनेतील संशयित मारेकरी यास  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

संगीता पिराजी शिंदे (वय ३६) असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे. तर यातील मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित किरण संजय कोळी (वय २६, रा. तळेगाव) याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान मृत संगीता या महिलेचे संशयित किरण कोळी याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असताना किरणच्या डोक्यात वेगवेगळ्या संशयानी घर केले होते. त्यातच १ जुलैला सकाळी दहाच्या सुमारास किरण हा महिलेच्या घरी आला. तिथे दोघांमध्ये वाद निर्माण (Crime News) झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या किरण कोळी याने महिलेच्या डोक्यात दगड टाकला आणि अन्य अवजड वस्तूनेही प्रहार केले.

डोक्याला जबर मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, संशयित घटनास्थळावरून पळून जात असताना शहापूरजवळच (Jamner) असलेल्या तळेगाव परिसरात निरीक्षक शिंदे व पथकाने ग्रामस्थांच्या सहकार्याने संशयिताला पकडले. संशयितावर नवीन लागू झालेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT