GOLD AND SILVER PRICE TODAY saam tv
महाराष्ट्र

गुड न्यूज! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

Gold And Silver Price Today In Jalgaon: जळगावच्या सुवर्ण बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोनं प्रतिदहा ग्रॅम २०० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो २,००० रुपयांनी स्वस्त झाली. जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगावच्या सुवर्ण बजारात सोने आणि चांदीच्या दरातील घसरण गुरुवारीही कायम राहिली. बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा दरात घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात प्रतिकिलो दोन हजारांची घट झाली असून, सोनेही प्रतिदहा ग्रॅम 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मधल्या काळात दरात काहीशी वाढ होत असली तरी एकूणच घसरणीचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोने-चांदीच्या दरांवर होत असल्याचे दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्याचे दर सरासरी स्थिर राहिले असले, तरी चांदीच्या दरात सरासरी पाच हजार रुपयांचे घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट

बुधवारी २८ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम १,२०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीविना एक लाख ४३ हजार रुपये झाला होता. मात्र, गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम एक लाख ४२ हजार ८०० रुपयांवर आला आहे.

चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त

चांदीच्या दरातही घसरण कायम आहे. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख ९८ हजार रुपये होता. गुरुवारी त्यात दोन हजार रुपयांची घट होऊन चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख ९६ हजार रुपयांवर आला आहे. हे दर जीएसटीविना आहेत. सोने आणि चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळत असला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे आगामी काळात दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : काही केल्या झोपच लागत नाही? या ७ गोष्टी करा, मनातलं तुफान शांत होईल

Diwali Utne : अभ्यंगस्नान करताना उटणे तेलातून लावावे की दुधातून, काय आहे फायदेशीर

Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह महिला पोलिसाचं तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ; कारणेही तितकीच धक्कादायक

कराडमधील कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू, वनविभागातर्फे तपास सुरू

Mobile Charging Safety Tips: मोबाईल चार्जिंग करताना ७ चुका कोणीही करू नका, होऊ शकतो मोठा स्फोट!

SCROLL FOR NEXT