Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : भिशीच्या नावाने १३ जणांकडून घेतले पैसे; ५५ लाख घेऊन फरार

Jalgaon News : दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने रक्कम जमा केली. यातील पैसे देणाऱ्या काही महिलांच्या भिशी लागल्या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ग्रामीण भागात, शहरातील कॉलन्यांमध्ये काही महिला एकत्रित येऊन दार महिन्याला भिशी टाकत असतात. त्यानुसार (Jalgaon) शहरातील योगेश्वरनगर परिसरातील काहींनी मिळून भिशी टाकली. मात्र याच भागातील दाम्पत्याने गृहिणीसह नागरिकांकडून दर महिन्याला भिशीची रक्कम गोळा करून फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ५५ लाख रुपये घेऊन दाम्पत्य पळून गेल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील योगेश्वरनगर भारत राहणारे सविता व संजय धोंडू सोळंखे या दाम्पत्याने ५५ लाखांचा चुना लावला आहे. जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड, कोल्हे हिल्स परिसरात योजनानगरातील महिलांकडून सविता सोळंखे या महिलेने दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने रक्कम जमा केली. यातील पैसे देणाऱ्या काही महिलांच्या भिशी लागल्या. मात्र पैशाचे काम असल्याने पुढच्या महिन्यात देते असे सांगत ही रक्कम सविता सोळंखे यांनी स्वतःजवळ ठेवून घेतली. तसेच पैशांच्या मोबदल्यात जास्त पैसे मिळतील, असे आमिष देखील दाखविले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बचत गटाच्या माध्यातूनही काढले कर्ज 

फसवणूक झालेल्या महिलांचा बचत गट देखील आहे. त्यांच्या नावाने बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले. शिवाय काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्जही काढून ती रक्कमही सोळंखे या महिलेने घेतली. मात्र प्रत्येक (Police) वेळी आजार किंवा इतर कोणत्याही कामाच्या बहाण्याने महिला रक्कम घेऊन महिलांची फसवणूक करत होती. परिसरातील तब्बल १३ महिलांकडून सुमारे ४१ लाख वेळोवेळी कुठल्या न कुठल्या कारणाने उकळून गडप केले. या प्रकरणात महिलांना ५५ लाख रुपयात गंडवल्याचे समोर आले. यासंदर्भात तालुका पोलिसात महिलांनी तक्रार दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT