Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: तपास पथकाच्‍या वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार; तिघे जखमी

तपास पथकाच्‍या वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार; तिघे जखमी

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : जिल्‍हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या वाहनावर भलेमोठे चिंचेचे जिर्ण झाड कोसळून दोन पोलिस (Police) कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. कासोदा- एरंडोल (Erandol) दरम्यान अंजनी प्रकल्पाच्या कालव्याजवळ पावणे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Latest Marathi News)

जळगाव जिल्‍हा आर्थिक गुन्हे शाखेचे तपासपथक शासकीय वाहनाने कासोद्याकडून एरंडोलकडे जात होते. गुरुवारी (२९ जून) पावणे नऊच्या दरम्यान भलेमोठे चिंचेचे झाड या पोलिस वाहनावर कोसळले. यात वाहनातील दोघे दाबले जाऊन (Accident) त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक दर्शन दातीर व पोलिस कर्मचारी अजय चौधरी यांचा अपघातात मृत्यू झाला. उर्वरीत तिघे जखमी झाले. अपघात घडला त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील हे त्यांच्या वाहनाने जवखेडा (ता. एरंडोल) येथे घरी जात होते. घटना पाहून त्यांनी तत्काळ एरंडोल पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष बारोडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उपनगराध्यक्ष कुणाल महाजन व ग्रामस्थांनी जखमींना तातडीने बाहेर काढून खासगी वाहनाने (Jalgaon) जळगावला रवाना केले.

तिघांची प्रकृती धोक्याबाहेर

पोलिसांच्या वाहनातील सहाय्यक फौजदार भरत जेठवे, नीलेश सूर्यवंशी आणि चंद्रकांत शिंदे अशा तिघांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले असून घटनेचे वृत्त कळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्‍हा रूग्णालयात धाव घेत चौकशी केली.

क्रेन लावून काढले मृतदेह

पोलिस वाहनावर पडलेले चिंचेचे झाड प्रचंड वजनी आणि भले मोठे असल्याने त्यात पोलिस वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. दोन कर्मचारी दबले गेल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने क्रेन मागवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर मदतकार्य सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Paneer Water Soup Recipe : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT