Farmer 
महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्तांनाच्या मदत यादीत जळगाव जिल्हा वगळला

अतिवृष्टीग्रस्तांनाच्या मदत यादीत जळगाव जिल्हा वगळला

साम टिव्ही ब्युरो

मेहूनबारे (जळगाव) : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर करण्यात आली. यात सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शासनाने घोषित केलेल्या मदत यादीत जळगाव जिल्ह्याला वगळले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. (Jalgaon district was left out of the relief list for flood victims)

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अवतिृष्टीमुळे व पूरपरिस्थितीने झालेल्या नुकसानीसाचे शेतकर्यांना वाढिव दराने मदत देण्याबाबत २६ ऑक्टोम्बरला शासन निर्णय झाला. या निर्णयात मदत देण्यात येणाऱ्या जिल्ह्यामध्ये पालघर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नादेंड, बीड, लातुर, उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्याचा समावेश असुन यातुन जळगाव जिल्हा वगळण्यात आला आहे.

सात तालुक्यात अतिवृष्टि तरीही..

जळगाव जिल्ह्यात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सर्वत्र अतिवृष्टी झाली. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. जळगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा या तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. उभ्या पिकात शेतांमध्ये अक्षरश: पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण उद्‌ध्वस्त झाला आहे. शासनाने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची घोर निरशा केली असुन जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मग्न असुन शेतकरी वार्यावर सोडुन दिल्याचे चित्र या निर्णयावरून दिसत आहे.

नेत्यांची भूमिका हवी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपले अर्ज बाद झाले म्हणून अधिकार्‍यांच्या दालनात तातडीने ठिय्या देणार या जिल्ह्यातील नेत्यांना या संदर्भात काहीही करावेसे वाटत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे ही भूमिका जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने घेतलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT