पहिल्या सहा महिन्यांत ४४३ आत्महत्यांची नोंद
लग्न जमत नसल्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून २९ तरुणांनी आत्महत्या केली.
जळगाव पोलीस दलाच्या अधिकृत आकडेवारीतून ही धक्कादायक बाब उघड
संजय महाजन, साम प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील आत्महत्येच्या प्रकरणातील आकडेवारीनं अख्खा महाराष्ट्र हादरुन गेलाय. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील ४४३ जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या का केल्या याचं कारण देखील समोर आली असून यातील प्रमुख कारण म्हणजे, लग्न न होणे. वेळेत लग्न न होणं ही एक सामाजिक चिंतेची बाब बनलीय. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून तब्बल २९ तरुणांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.
सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४४३ आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ३८३ पुरुष, २९ महिला, ८ लहान मुले आणि ११ लहान मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सुमारे ९० टक्के इतके आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी १२ गुन्हे दाखल केले आहेत.
दारूचे व्यसन (९०), नैराश्य (७४), कौटुंबिक कलह (६१), कर्जबाजारीपणा (५२) आणि गंभीर आजार (४४) ही कारणे समोर आली आहेत. तर लग्न जमत नसल्याने २९ जणांनी जीवन संपवणे ही बाब चिंताजनक मानली जातेय. अपेक्षा, आर्थिक अस्थिरता, वाढते वय आणि वारंवार येणारे नकार यामुळे अनेक तरुण मानसिकदृष्ट्या खचत असल्याने ते आत्महत्या करत असल्याची सांगितलं जातंय.
विवाह हा आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असला तरी तो व्यक्तीच्या अस्तित्वाचे मोजमाप ठरू नये. विवाहाबाबत सामाजिक दबाव कमी करणे, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणं. अडचणीत असलेल्या तरुणांना वेळेत समुपदेशन व भावनिक आधार गरजेचे आहे.
महिलांमध्ये कौटुंबिक वाद आणि नैराश्य ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. तसेच लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्येही कौटुंबिक तणाव, परीक्षेचे दडपण आणि प्रेमप्रकरणांमुळे आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.