Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: काही सेंकदात पावणे सात लाखांची रोकड लांबविली; सीसीटीव्‍हीमध्‍ये घटना कैद

काही सेंकदात पावणे सात लाखांची रोकड लांबविली; सीसीटीव्‍हीमध्‍ये घटना कैद

साम टिव्ही ब्युरो

धरणगाव (जळगाव) : धरणगाव शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबविल्याची (Jalgaon News) घटना घडली. सकाळी व्यापारी दुकान उघडत होता. दुकानाचे शटर उघडून दुसरे शटर उघडत असतांना ही घटना घडली. अवघ्या काही क्षणातच पावणे सात लाखांची रोकड (Crime News) चोरट्यांनी गायब केली. (Tajya Batmya)

धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गौरव डेडीया यांचे अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकान आहे. ते होलसेलचे व्यापारी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी आले होते. गुंजन डेडीया यांनी दुकानाचे एका बाजूचे शटर उघडून जवळ असलेली पावणे सात लाखांची रोकडची पिशवी शटर उघडलेल्या दुकानात ठेवली. यानंतर त्याच दुकानाचे समोरील शटर उघडण्यासाठी गेले.

सीसीटीव्‍हीमध्‍ये झाले कैद

याच दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी संधी साधत पावणे सात लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पोबारा केला. दरम्यान चोरटे हे दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. चोरट्यांनी डेडीया यांच्यावर पाळत ठेवली असावी, तसेच व्यापारी गौरव डेडीया यांच्या परिचितांमधील कुणीतरी रोकडबाबत टीप दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Second Hand Iphone : सेंकड हँड आयफोन घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Priyadarshini Indalkar: 'अधुरी बातों की तरह...'; 'दशावतार' निमित्त प्रियदर्शनी इंदलकरचा दिलकश अंदाज

'कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा...'मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून पक्षाला जय महाराष्ट्र, मनातील खदखद बोलून दाखवली

Samruddhi Kelkar: नथीचा नखरा! मराठमोळ्या समृद्ध केळकरचं सौंदर्य पाहताच खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT