Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : धुळवडीचा उत्साह क्षणात विरला; रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर जितेंद्र तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर पोहण्यास गेला.

Rajesh Sonwane

जळगाव : धुळवड असल्याने सकाळपासून मित्रांसोबत रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावल्याचा आनंद घेतला. (Jalgaon) परंतु हा आनंद दुपारनंतर दुःखाच्या खाईत लोटला गेले. रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून (Death) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हि घटना धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली. (Tajya Batmya)

धरणगावातील (Dharangaon) लोहार गल्लीतील जितेंद्र माळी (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जितेंद्र हा आपल्या सर्व मित्रांसोबत सकाळी रंगपंचमी खेळण्यासाठी गेला होता. सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर जितेंद्र तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर पोहण्यास गेला. पोहत असताना जितेंद्र पाण्यात बुडायला लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जितेंद्रच्या मित्रांनी याबाबत गावात माहिती दिली. यानंतर ग्रामस्थ तळाजवळ पोहचले. साधारण तीन- चार तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह तलावातून काढण्यात आला. दरम्यान, धूळवाडीच्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. धरणगाव पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT