Jalgaon Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Cyber Crime: पन्नास– शंभर रुपयांच्या लालसेत गमावले तीन लाख; यू-ट्यूब सबस्क्रीप्शनच्या नावे लुटले

पन्नास– शंभर रुपयांच्या लालसेत गमावले तीन लाख; यू-ट्यूब सबस्क्रीप्शनच्या नावे लुटले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील भोईटेनगरमधील रेल्वे कर्मचाऱ्याला यू-ट्यूब सबस्क्रीप्शनवर ५० व १५० रुपये रिफंडचे (Cyber Crime) आमिष देत तब्बल दोन लाख ९४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केली. (Breaking Marathi News)

मनोजकुमार सुनहरीलाल राज (वय ४५) यांना एका (Jalgaon News) अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यात यू-ट्यूब लिंकवर सबस्क्रीप्शन केल्यास आपल्याला प्रत्येकी ५० व दीडशे रुपये मिळतील, अशी बतावणी केली. त्यानंतर मनोजकुमार यांनी लिंकला सबस्क्रीप्शन केले असता समोरच्‍याने टेलिग्रॅमच्या आयडीवर ग्रुप जॉइन करून घेतला. त्या ग्रुपमध्ये ८ ते ११ मे दरम्यान केलेले सबस्क्रीप्शनचे एकूण चार हजार ३५० रुपये दिले. त्यानंतर मनोजकुमार यांनी सांगितलेल्या बँक खात्यात पैसे पाठविले.

वेगवेगळी कारणाने लाटले पैसे

यानंतर वेगवेगळी कारणे सांगून मनोजकुमार यांच्याकडून सुमारे दोन लाख ९४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोजकुमार राज यांनी मंगळवारी (ता. १६) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhaditya Rajyog: मंगळाच्या राशीत तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, व्यवसायातही होणार लाभ

Anil Deshmukh : बापावर हल्ला, मुलगा मैदानात; सलील देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर इजा, उपचार सुरु; वातावरण तापलं

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

SCROLL FOR NEXT