Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : क्रेडिट कार्डवर ऑफरचे आमिष पडले महागात; ॲप डाऊनलोड करताच खात्यातील रक्कम गायब

Jalgaon News : समोरच्याने कोणते क्रेडीट कार्ड वापरता, अशी विचारणा केली असता या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने संपूर्ण माहिती दिली

Rajesh Sonwane

जळगाव : सेवानिवृत्त झालेल्या एका व्यक्तीला फोन करून क्रेडिट कार्ड विषयी माहिती जाणून घेतली. मात्र खाजगी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर असल्याचे सांगत सांगितले. यावर विश्वास ठेवून क्रेडिट कार्डासाठी होकार दिला. यानंतर संबंधिताने सांगितल्यानुसार मोबाईल ॲप डाऊनलोड करताच बँक खात्यातून २ लाख ७८ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव (Jalgaon) शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्याला १५ ऑगस्टला एका अनोळखी व्यक्तीने फोनवर संपर्क केला. समोरच्याने कोणते क्रेडीट कार्ड वापरता, अशी विचारणा केली असता या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने संपूर्ण माहिती दिली. (Cyber Crime) त्यानंतर एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डची माहिती देत त्यावर चांगली ऑफर असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत कार्ड घेण्याबाबत होकार दर्शविला. 

ॲप डाऊनलोड करताच रक्कम काढली 

समोरच्या व्यक्तीने सेवानिवृत्तास लिंक पाठविण्यासह एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओटीपी व इतर कोणतीही माहिती दिली नाही, मात्र ॲपमुळे मोबाईलमधील सर्व माहिती दिसू लागल्याने याचा फायदा उचलत संबंधिताने बँक खात्यातून दोन लाख ७८ हजार ८८५ रुपये काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT