जळगावात धक्कादायक घटना
रेशन कार्ड तयार करून देण्याच्या बहाण्याने ३० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी
महिलेचा विनयभंगही केला
संतप्त महिलांनी संशयिताला जाब विचारत मारहाण केली
जळगाव शहरात रेशन कार्ड तयार करून देण्याचे आमिष दाखवत एका 30 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संतप्त महिलांनी संशयिताला जाब विचारत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला रेशन कार्ड बनवायचं होत. याच दरम्यान तिची सुनील पाटील याच्याशी ओळख झाली. दरम्यान सुनीलने महिलेला रेशन कार्ड लवकर तयार करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने महिलेला तहसील कार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलावले. मात्र, तेथे भेट झाल्यानंतर त्याने महिलेशी अयोग्य वर्तन करत शरीरसुखाची मागणी केली.
या प्रकारामुळे महिला हादरली. तिने तत्काळ कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर काही महिलांनी एकत्र येत सुनीलला जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि संतप्त महिलांनी पाटीलला चोप दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित सुनील पाटील याच्याविरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाटीलला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.